लुच्चा
लुच्चा
पाऊस असा
रात्रीच्या कुशीत शिरतो,
उद्याच्या प्रकाशाची
पेरणी करतो...
गच्च भरतात मळभ,
चातक मनातला
मनधरणी करतो
थोपवून तरी किती ठेवावा?
बांध पापण्यांच्या कच्चा,
पाऊस शोधतोच वाट कोपऱ्यातून
लबाड ...लुच्चा !!!!
पाऊस असा
रात्रीच्या कुशीत शिरतो,
उद्याच्या प्रकाशाची
पेरणी करतो...
गच्च भरतात मळभ,
चातक मनातला
मनधरणी करतो
थोपवून तरी किती ठेवावा?
बांध पापण्यांच्या कच्चा,
पाऊस शोधतोच वाट कोपऱ्यातून
लबाड ...लुच्चा !!!!