STORYMIRROR

Padmakar Bhave

Classics Inspirational

3  

Padmakar Bhave

Classics Inspirational

श्रावण गाणं

श्रावण गाणं

1 min
138

श्रावणाच्या गं कुशीत

लपंडाव पावसाचा

कधी उजेड सोनेरी

कधी चिंब चिंब सरी


श्रावणाच्या गं कुशीत

फुलं उमलली दारी,

मन सुसाट धावते

खग होऊन माहेरी


माझा साना भाऊराया

शेती खपत असेल

जोडी शिर्प्या गणप्याची

तिथे राबत असेल


श्रावणाच्या सरी ओल्या

पापण्यांत ओथंबल्या,

अलगद गं माहेरी

मला घेऊन उडाल्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics