दुपारच्या पारी (सहाक्षरी)
दुपारच्या पारी (सहाक्षरी)
दुपारच्या पारी
वेळ विश्रांतीची
सवय जडली
ती वामकुक्षीची 1
दारात उभ्याने
गप्पाच रंगती
कधी गंमतीच्या
मैत्रिणी संगती 2
मग सय येई
दुपाराच्या पारी
गप्पा फार झाल्या
झोप आली भारी 3
तरी न संपती
फड तो गप्पांचा
खेद वाटे मना
झोप चुकल्याचा 4
कधी ऐकायला
मौज वाटे गाणी
दुपारच्या पारी
जुनी ती पुराणी 5
कधी गमे मज
घेऊन लेखणी
कविता रचावी
असेल देखणी 6
म्हणूनच आज
दुपारच्या पारी
रचिली पहा मी
सहाक्षरी भारी 7
