ओढा
ओढा
एकदा एक
उदासीनतेचा ओढा
गर्द रानाच्या मधोमधच थांबला
किनाऱ्यावरील उभ्या झाडांच्या
करड्या सावल्या तिथल्याच
जवळपासच्या क्षितीजावर
अंधूकश्या प्रकाशातअस्पष्टश्या उमटल्या होत्या
जवळच्या जीर्ण खडकावरचा
तो एक रंगीत किडा
उगीचच मनाला भुरळ घालत होता
तो स्वतःच्याच स्वप्नातल्या मौसमी वा-यांना
माघारी फिरवत त्यातल्या
सुखदुःखाशी खेळत डोलत
त्या उदासीन ओढ्याला न्याहळत होता
