प्रवास
प्रवास
असाही एक प्रवास
हिरवळीतून जाणारा
सोबतीला सावली धरणारी झाडं आहेत
सावलीला स्पशून जाणार ऊनही आहे
एखादा चूकार पक्षी
फडफड करत
शांततेला ओरखडा काढत
जंगलाच्या गर्दीत गायब होतोय
तो का आला न् कुठं गेला
याचं कुणालाच सोयरसुतक नाही
आकाशात एखादा ढग
उगीचच रेंगाळतोय
नद्या नाले झुळझुळतायत
नाजूक वेली, वाढलेली न् वठलेली झाडं
या गहि-या शांतपणे
आपल्या अस्तित्वाचा गहनबिंदू
शोधण्यात मग्न आहेत
या प्रवासात मीही मला शोधतोय
असाही एक आगळावेगळा प्रवास
हिरवळीतून जाणारा
शांततेतून शांततेकडे जाणारा प्रवास
अस्तित्वाचा गहनबिंदू शोधणा-या
झाडाबरोबरचा प्रवास