पान
पान
1 min
200
दोन पाने
एक हिरव
एक पिवळ
एक हसरं
एक रडकं
एकदा दोघेही
पावसात भिजली
उन्हात उन्हानं करपली
एकदा एक
वा-याची झुळूक आली
एक हसलं
दुसरं घाबरलं
एकदा नाजूक
हाताचा स्पर्श झाला
एक खुललं
एक गळून पडलं
नाजूक हाताचाही
स्पर्शही त्याला सहवेना
खाली पडून
आपला अर्थ
शोधू लागलं
आजूबाजूच्या पाचोळ्यात