कोडं सहनशीलचे
कोडं सहनशीलचे
खूप सहन केलं
रात्रीच्या अंधाराला प्रश्न विचारत
काळजाला कोडे घालत न्
सोडवलेल्या कोड्यात
पुन्हा पुन्हा त्यांच मृगजळी कोड्यात अडकत जगत आलोय
कसं न् किती सहन करायचं
आणि का सहन करायचं
हेच आता समजेनासं झालंय न्
हे सगळं सहन करता करता
ते मृगजळच गायब झालंय
स्वप्नांची नक्षत्रंही आजूबाजूच्या
पेटलेल्या वणव्यात भस्मसात झालीत
खरंच खूप सहन केलंय
आता सहनशक्तीचा अंत झालाय
आता शोधतोय ...
या बाजारबुणग्या वर्तमानात
हरवून गेलेले माझं
भूतकाळातलं लाल पिवळं अस्तित्व
ते माझं फाटकं तुटकं आभाळ
श्वासांच्या साखळीत अवजड शिळा बनून राहिलेले क्षण
कदाचित ......
तेच मला सहन करण्याची ताकद देतील
क्षणभरांसाठी असेना