वळण
वळण
वळणा वळणाची
वळणदार वाट
घनदाट झाडां झुडूपातून जाणारी
ती वळणदार वाट
त्या झाडांच्या पानांची सळसळ
पक्षांचे वेगवेगळे आवाजातून वाट काढत काढत
एका अनामिक ओढीने
रखडत रखडत पुढं जातोय
नवं आकाश शोघण्यासाठी
पण.....
त्या तिथंच दडून राहिलेला
तुझा मौनातला अंधार न्
ती श्वासात गुंतलेली सुगंधी दरवळीनं
पाय क्षणभरासाठी तिथंच थबकले
आणि तो मौनातला अंधार
सुगंधी श्वास आणि आसपास असलेली
तुझी अबोल अदृश्य नजर असं बरंच काही
सांगत होती ....
पण ते सारं डोळ्यांतून ओघळणा-या थेंबातून
ओघळत ओघळत आपल्या
पिवळ्या पडलेल्या नात्याच्या
पिंपळपानावरच राहत होतं
मी मात्र या वळणदार वाटेवर
अजूनही माझं नवं आकाश
शोधतो आजही आणि अजूनही