संध्याकाळ
संध्याकाळ
संध्याकाळ होतेय
वादळ घोंगावतेय
कुठंतरी
गच्चीतल्या कोपऱ्यातच
भरलेलं आभाळ कोसळतय
गार वारा झोंबतोय
पक्षी घराकडं निघालीत
ओला पाऊस लांब कुठंतरी जळतोय
झाडांच्या खोडात रात्र अंगाच मुटकुळं करून विसावलीय
टिटवीचा आवाज कानाला छळतोय
सगळीकडे अंधार आहे
मनात चिखल आहे
आभाळ निराळं आहे
मेघ वेगळा आहे
ओल्या चिंब क्षणातही
रक्ताचेच निखारे आहेत
पण ...
डोळ्यात पावसामधला जिव्हाळा आहे
अश्या पावसासाठीच तर
हा उन्हाळा सोसला होता
वादळ झेलल होतं
या अश्या संध्याकाळ साठीच