STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Abstract Tragedy

4  

Sangam Pipe Line Wala

Abstract Tragedy

लोककाव्य....

लोककाव्य....

1 min
463

करतो मी देवा तूझी भक्ती 

माझ्या आशेला मिळावी मुक्ती 

का बंद केले माझ्यासाठी दरवाजे.....


देवा मी आता हात जोडताना लाजे 

माझं दुःख इतकं की चारी दिशात गाजे.....


दुर झाली जगातली सारी नाती 

उरल्या आहेत फक्त तीन रेषा हाती 

सुखाचा शोधला दुःखाचा सूर कानी वाजे.....


माझी आज ही तुझ्यावर आस्था 

तू पाहत नाहीस माझी बिकट अवस्था 

तू दिलेला हा एकांत माझ्या जीवनी साजे......


संगम आहे हा देवा तुझा भक्त खरा

येऊ दे माझ्या जीवनात सुखाचा झरा

चेहऱ्यावर हसू मनात माझ्या दुःख ताजे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract