दरवळ
दरवळ
कृष्णाच्या रंगात
राधेच्या संगात
हरीच्या प्रेमात
मीरेच्या भक्तीत
आसमंतात फक्त तूच
आणि तुझीच सावली
आता ओढ फक्त
तुझ्याच श्वासाची
अन् ....
इकडं तर श्रावणही बहरात आलाय
गारवा मोहरत चाललाय
मनात मारवा दरवतोय
आणि ही दरवळही
काही केल्या पाठ सोडायला तयार नाही
खरंच .....
अश्यावेळी काय करावं समजत नाही