क्षण
क्षण
गंधीत क्षण
मंतरलेले क्षण
श्वासात श्वास रूजलेले
स्पंदनात स्पंपने मिसळलेली
फुलतात क्षण
अर्थाभोवती अर्थ रूंजी घालतात
गंध ओघळतात
मनातला प्राजक्त बहरतो
क्षण आणखीनच जवळ येतात
क्षणाचा क्षणांशी संवाद होतो
निराकार श्वास
देहाच्या कुडीत भरला जातो
भावनांची आंदोलनं स्थिर होतात
सैरभैर मनाला वेघ लागतात
त्या उजेडातल्या आकाशाचे
या गंधालेल्या मंतरलेल्या क्षणात