हिरवा पाऊस
हिरवा पाऊस
हिरव्या ऋतूतला
हिरव्या कविता
हिरव्यागार पावसाच्या
हिरवीच की हो सर
कधी हिरवा पाऊस
कावरा बावरा होतो तर
कधी होतो सैरभैर
हिरव्यागार माळरानावर
हिरवा पाऊस
एकटाच बरसत राहतो
हिरव्यागार माळरानावरच्या
हिरव्या बोरी- बाभळी सोबत
सांजवेळी ऐकताना पावा
आठवत राहतो
कधी आपल्या राघेला तर कधी मीरेला