निशःद
निशःद
द्वंद सुखाशी उगीच नाही
दुःख उन्हाचे नभात नाही
विसर पडावा एवढी सुद्धा
तुझी माझी ओळख नाही
असे जर साथ निलकंठाची
समुद्र मंथनही असाध्य नाही
कितीक आळवू मेघमल्हार
नशीब माझे काही बरसत नाही
येत जा अशीच तू अधूनमधून
तेव्हा मात्र मी होणार नाही
निशःब्द ... निशःब्द...निःशब्द
दुःख उन्हाचे नभात असणार नाही