राहून गेलंय
राहून गेलंय
जगाकडं बघून जगताना
तुझ्याकडे लक्ष द्यायचं राहून गेलं
गालावरच्या वेगवेगळ्या रंगाचेही अर्थ कधी समजला नाही की
तुझ्या दोन शब्दां मधला अर्थ समजला नाही
किंवा त्या मिठीचाही अर्थ समजला नाही
त्या रुसव्या फुगव्याचाही अर्थ कधी समजला नाही
जेव्हा या सा-यांचा अर्थ शोधायला सुरूवात केला
तेव्हा खूप उशीर झाला होता
ज्यांना मी श्वास म्हणायचो
त्याच्याच श्वासात मी स्वतःला शोधायला लागलो
तेव्हा तुझ्या श्वासांचा विचारही केला नाही
शोधता शोधता खूप धावलो
खूप पळालो, धडपडलो, अडखळलो
पण पळतच राहिलो
पळता पळता खूप लांब आलो
मागचा रस्ता खूप मागं राहिला
तुझ्या माझ्यातलं अंतर वाढत गेलं
जगाकडं बघत राहिलो
तुझ्याकडे लक्ष द्यायचं राहून गेलं