STORYMIRROR

Chandan Pawar

Abstract Inspirational

4  

Chandan Pawar

Abstract Inspirational

पुन्हा " शिवा " पाहिजे

पुन्हा " शिवा " पाहिजे

1 min
379

अंधारालाही दूर करेल 

असा दिवा पाहिजे

प्रजेच्या कल्यानाकरता

पुन्हा "शिवा" पाहिजे.


ज्याला त्याला जातीधर्माची

उगीचच मस्ती आहे,

वस्तीचे नाव सांगते इथे

कोणाची वस्ती आहे.

अस्मितेच्या नावाखाली हा

समाजविघातक डाव आहे,

विशिष्ट वस्तीला विशिष्ट

महापुरुषांचे नाव आहे. 

खरी अस्मिता जगवण्याकरता

पुन्हा "शिवा" पाहिजे.


शेतकऱ्याचा माल स्वस्त 

व्यापाऱ्याचा महाग आहे,

नेहमीच्या चुकीच्या धोरणांचा 

 हा सारा भाग आहे. 

एकाने रक्त ओकून दुसऱ्याने

महाग विकायचा धंदा आहे,

वरून शेतकऱ्यास म्हणायचे

तू जगाचा 'पोशिंदा' आहे.

या पोशिंद्याला वाचवण्याकरता

पुन्हा "शिवा" पाहिजे.


कोणाच्या नावे करावा शिमगा

व कोणाची मारावी बोंब,

ज्याच्या हाती द्यावी सत्ता ,

त्यासच फुटतो भ्रष्टाचाराचा कोंब.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत 

सर्वत्र भ्रष्टांची टोळी आहे,

तत्त्वे व मूल्यांची इथे

दररोज होळी आहे.

हा भ्रष्टाचार रोखण्याकरता

 पुन्हा "शिवा"पाहिजे.


महिला आरक्षणाचे प्रकार 

गंभीर पण सोपे आहेत,

निवडून आल्या बाया पण 

कारभारी मात्र बापे आहेत.

नवरा-दीर, सासरा-बाप

भावानेही अधिकार लाटले आहेत,

महिला आरक्षणाचे अपहरण सगेसोयरे करत सुटले आहेत.

समाजातील महिला मुक्तीकरता

पुन्हा "शिवा" पाहिजे.


२०११ ची जनगणना सांगते

वाईट परिणाम होऊ शकतात

हजारांपैकी शहांऐशी जण

बिनलग्नाचे राहू शकतात.

जशी मागणी तसा पुरवठा

तरीही मुलींची चणचण भासेल,

घोडनवऱ्या मुलांची मग

बायकांसाठी वणवण असेल.

स्त्रीभ्रूण हत्या थांबण्याकरता

पुन्हा "शिवा" पाहिजे.


घरातल्या स्वयंपाकघरात 

महागाईचा वास आहे,

चिकन झालय स्वस्त

गॅस मात्र महाग आहे.

भडकलेल्या महागाईला

आता विझवायच कस?

स्वयंपाकघराला प्रयशन पडतो

आता शिजवायच कसं ?

महागाईचा वणवा विझवण्याकरता

पुन्हा "शिवा" पाहिजे. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract