STORYMIRROR

vaishali vartak

Classics Others

4  

vaishali vartak

Classics Others

आंगण

आंगण

1 min
278

असे छोटेसे अंगण

पहा कसे ऐटदार

 शोभा वाढवी घराची

 दिसे सदा शानदार


दारी उभी बोगन

 स्वागताला अंगणात 

येता जाता देई छाया

खुश होतात मनात


पुढे झेंडू बहरला

सदा झुकवून मान

फुले येती बारमास 

पाकळ्यांची पहा शान


औषधाला सदा राखली

दाट जाड पाने ओव्याची

पालक हिरवा डुलतो

पालेभाजी मिळे अंगणाची


जुई लवुन खिडकीत 

सुंगध पसरवे गात गाणी

माहेराच्या अंगणात

डौलात उभी रातराणी


मधोमध झुलतो झुला

आठवांचा तो पसारा

मस्त बसून जाते रंगून

 देतो सदा सुखद शहारा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics