Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Yogita Takatrao

Classics

4  

Yogita Takatrao

Classics

ऐश्वर्याचे वरदान

ऐश्वर्याचे वरदान

1 min
314


चोहीकडे सजलेली....

थेंबा थेंबाची झुंबरे ,

नक्षीदार कमानींची

शोभे पर्णांना उंबरे !......१


पावसाच्या सरींमुळे....

रान फुलांनी सजले ,

झाडे,वेली,नद्या,झरे

सारे जणू शहारले !.......२


सृजनाने निसर्गाच्या....

नव सौंदर्य जन्मले ,

ऐश्वर्याचे वरदान

मनःचक्षू सुखावले !.......३


इंद्रधनु हलकेच...

देतो ग्वाही अस्तित्वाची , 

चावी स्वर्गाची नभात 

मनोहारी सोहळ्याची !.......४


तृणांकुर फुटलेले...

जागोजागी धरेवरी ,

सडा फळं, सुमनांचा

चालताना वाटेवरी !.......५


मंत्रमुग्ध पक्षी,प्राणी...

हवी त्यांना हिरवाई , 

वर्षा ऋतूची पर्वणी

मानवास नवलाई !.........६


Rate this content
Log in