माझ्यातल्या मुलीला
माझ्यातल्या मुलीला
माझ्यातल्या मुलीला अडवायचे कशाला
मारून मन स्वतःला गमवायचे कशाला
सांगायचे जिवाला वेचायचे सुखांना
का कोण काय वदला शोधायचे कशाला
बोलावतील येथे खोटे जुने गुन्हे ते
सारे खरे पुरावे गिरवायचे कशाला
आहे उरात वणवा दाबून पेटलेला
लावून आग गेली समजायचे कशाला
वाघीण ठेवते ही राखीव आसवांना
होतेय मुक्त आता गुंतायचे कशाला
