बीज आंकुरे अंकुरे
बीज आंकुरे अंकुरे
बरसता वर्षा धारा
ओल चिंब रान झाले
थेंब मुरता मातीत
ऊभारुन कोंबआले
कोंबातून डोकवती
ईवलीशी दोन पान
वा-यासंगे देती टाळी
गात समृध्दीचे गान
बीजे अंकुरे अंकुरे
छोटी झाली पहा रोप
नभाकडे पहाताती
देण्या शिवारा निरोप
शेते हिरवी दिसती
किती पहा ती रेखीव
जणु रेखाटल्या कोणी
ओळी हिरव्या आखीव
दिसे सर्वत्र हिरवे
जणु पाचू पसरले
बळी राजा सुखावला
मन प्रसन्न जाहले
