STORYMIRROR

vaishali vartak

Abstract Classics Inspirational

4  

vaishali vartak

Abstract Classics Inspirational

अभंग अभिमान महाराष्ट्राचा

अभंग अभिमान महाराष्ट्राचा

1 min
293

प्रिय असे मला । माझा महाराष्ट्र । 

आहे सर्वोत्कृष्ट । भारतात  ।।   1


मम देश मज । जणु माझा प्राण । 

वाटे तो महान । जगतात ।।   2


हिंदवी राज्याची । स्थापना भूमीत । 

वसे सह्याद्रीच्या । तो कुशीत  ।।  3


 मराठी संस्कृती । संपन्नता किती । 

तिची पहा ख्याती । जगताती ।।  4


पाऊल ते पुढे । कला साहित्यात ।  

गायक निष्णात । लता एक ।।   5


किती वर्णू त्याचे । मीच गुणगान । 

असा तो महान । महाराष्ट्र ।।   6


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract