STORYMIRROR

vaishali vartak

Classics Inspirational Others

4  

vaishali vartak

Classics Inspirational Others

निष्ठावंत बाबा

निष्ठावंत बाबा

1 min
414


माझा बाबा निष्ठावंत

तेची घराचा आधार

किती आनंदे संभाळी

सा-या कुटुंबाचा भार


लेकरांच्या सुखासाठी

सदा तळमळ साही

स्वतः कडे दुर्लक्षता

कुटुंबाचे सुख पाही


 चिंता आम्हा लेकरांची

मनी एकची तो ध्यास 

होवो मुले यशवंत

हीच असे मनी आस


सारुनिया हौसमौज

सदा घडविण्या दक्ष

पुरविले हटृ लाड

आम्हा मुलांकडे लक्ष


  जरी संगे नाही बाबा

  केले आम्हा भाग्यवान

गेल्या जन्माची पुण्याई

झालो आम्ही पुण्यवान


 

तेची मजला सर्वस्व

बाबा आहेत आदर्श 

 पोहण्यात पारंगत

माझा केलाय उत्कर्ष


किती ऋण मजवरी

कधी न व्हावा विसर

फेडण्यास त्याचे ऋण

घडो सेवा निरंतर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics