आला पाऊस भरून
आला पाऊस भरून
आला पाऊस भरून
गाई व्याकुळ करुण
नभ उतरू लागता
गेले पाडस भिऊन
रान सुनसान झाले
पक्षी कोटरात ओले
सखा सजणीचा दूर
डोळे वाटेत निमाले
गंध मातीला सुटला
वारा संतूर जाहला
डोंगराळ कपारीत
वेड्यासम भटकला
चाफा अंगणी भिजला
कळी फुलांत नाचला
काळ्या सावळ्या मेघांचा
गाव शिवारात शेला
