STORYMIRROR

Jayshri Dani

Classics

4  

Jayshri Dani

Classics

प्रीती

प्रीती

1 min
235

पक्षी होऊन नाचू लागले

झाड अवतीभवती          

मी मिठीत मज घेतले

अन् करून बसले प्रीती     


पानेही होती गळलेली

नि सांद्रसुखाचे वारे       

तुझ्या देहाच्या मखमालीवर

सरसर वळती तारे       


टाळून वर्दळ आले मधोमध

शुभ्र वस्त्र लेवूनी      

गतजन्मीचा सुगंध पसरला

चंद्रबिंब नसुनी     


आवाज श्वासांचे, भासाचे

येई मंद घूमत         

तू नसता तुझ्या जाणिवेला

हिरव्या वेली कवळत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics