STORYMIRROR

Jayshri Dani

Romance Classics

3  

Jayshri Dani

Romance Classics

सजणी

सजणी

1 min
105

सावळ्या मी साजणाची

गोरीपान सजणी गं।

भेटायाला मज तोही

करीतसे तगमग।


अंधारून येई सारे

खुले मेघांचा मंडप।

लता-वेलींत होतसे

मग वाराही गडप।


चाफ्याच्या गं उरी दाटे

गर्द हिरवी शांतता।

प्रेमातुर मीलनाची

जाई चोहीकडे वार्ता।


पाखरेही थोडा वेळ

थांबवती फडफड 

दिगंबर देहावर 

गर्भरेशमाची लड।


असे चिंब ओले भोग

जसा पावसात मध

तसा गोडवा गोडवा

स्पर्श स्पर्शाचे औषध


सरे पहिला आवेग

अंकुराची कुणकुण।

मनाच्या गं उद्यानात

अलबेली रुणझुण



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance