STORYMIRROR

Jayshri Dani

Others

3  

Jayshri Dani

Others

लळा

लळा

1 min
163

उन मावळता सूर्य

तळ्यालाच सांगे कथा

तळ्यातल्या आर्द्रतेची

झुळझुळ वाहे व्यथा


पोहताना मनोहर 

पिल्लू बगळे बदक 

सूर मारताना पक्षी  

उठे तरंग मोहक 


काठावर तरूवेली

न्याहाळती प्रतिबिंब

दिन कलता सुखाने 

भुई आत ओलिचिंब


तम ओथंबून येता

सैरावैरा तो पाचोळा 

कुशी मृदूल संध्येची 

कौमुदीस लावी लळा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन