STORYMIRROR

Jayshri Dani

Classics

4  

Jayshri Dani

Classics

निळी तान

निळी तान

1 min
340

अज्ञात तीरावर दोन नावा

निळा शांतसा परिसर

उमगण्यासाठी बोलणे व्यर्थ

इतका अर्थगर्भ मौन गहिवर....


मनातल्या खूणगाठींवर

अबोल्याचे घट्ट अस्तर

एखादी रात्र येते

टाळून सारे मंतर....


वाटच नाही तर वाट कसली

समोर अवघे पाणीच पाणी

पुन्हा पाठवू नकोस तू मला

नीर निथळणारी तुझी गाणी....


वळते मी आता कुशीवर 

दूर जरी कुठे पेटले रान 

माझ्यापाशी माझे दुःख

आणि एक अनामिक निळी तान....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics