गौरी आगमन
गौरी आगमन
सोनपावलाने आली घरी
गौरी बसली पाटावरी
पहिल्या दिवशी येताच
नैवेद्य भाजी भाकरी
रांगोळ्या काढून दारी
पावलं काढले भारी
गौरीचे आगमन झाले
साडी नेसून न्यारी
दिसतात खूप छान
तीन दिवस त्यांचा मान
लावले कपाळी कुंकू
जशी सौभाग्याची खाण
तोरण झुंबर दारी
हातवे देऊनी पाच
पूजा अर्चा करुनि
करू गौरीचा साज
आली गौराई घरात
पूजा केली आनंदाने
तीन दिवस राहा माऊली
माझ्या घरात तू सुखाने
भाऊ गणपती येतो
गौरी आणया माहेरी
खेळ खेळून अंगणी
गौरी राहते सदा हसरी
