फक्त माणूस व्हायचंय..
फक्त माणूस व्हायचंय..




फक्त माणूस व्हायचंय म्हणून माणूस झालाे,
दगडाला आकार दिला म्हणून मूर्तीत बदललाे...
माती तुडविली म्हणून मडक्याला आला आकार,
सुयोग्य मेहनत केली म्हणून स्वप्न झाले साकार...
फक्त माणूस व्हायचंय म्हणून माणूस झालाे,
खाचखळगे टाळत जगणं सुकर बनवत गेलाे...
माझ्यापेक्षा दुःखी कष्टकरींचे जगणं मी बघितले,
प्रतिकूल परिस्थितीतही ताेल ढळू न देता सावरले...