STORYMIRROR

Jayshri Dani

Abstract

3  

Jayshri Dani

Abstract

वारा

वारा

1 min
204

तशी

वाऱ्याची मुशाफिरी 

सुरू असते 

अचूक


गाईच्या गोठ्यात हंबरतो 

वारा कुलीन वेळी

क्षितिजावर रंगांगाची 

उमटत असते जाळी 


कवीच्या ओळींवरून 

पळतो सुसाट 

पार करतो फुलांचा घाट 

तुडवत काट्यांची वाट...


वारा वाहताना नदीवरून 

काळजात भरून घेतो ओल

भिरभिरतो देवळाच्या पारीवर 

उत्तर शोधण्या गोल गोल...


रूपगर्वितेच्या बटांमध्ये 

वारा खोवतो धांदल

हलकेच कुरवाळून जातो

भावभोळी मलमल....


अतीव रड़वेल्या क्षणी

वारा गोंजारून काहीली 

वेदनेस संवेदनेची

देतसे सावली...


एकटाच वेडापिसा

वारा वाहतो दरीखोऱ्यात 

रानावनाच्या कुशीत 

माजोर तोऱ्यात...


वाऱ्यावर विरून जाई

कित्येक स्वप्न-कहाण्या 

भूत, वर्तमान, भविष्यातील 

अगणित चांदण्या !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract