फेसबुक
फेसबुक
आजकाल मी फेसबुक शिवाय
कुठेच व्यक्त होत नाही
मन मोकळं करायला आता खांदे कुठे उरलेंत
फेसबुक मला ओंजारतं गोंजारतंतरी
माणसांनी झिडकारलं तरी फेसबुकच्या
लाईक मुळे मी जिवंत आहे
माणसाशी आता मी फेसबुकच्या
माध्यमातूनच बोलतों
लोकांचे स्वभाव, अंतरंग मला
फेसबुक मुळें जास्त कळालें
लोकांचं तोलून-मापून वागणं,
जळणं फेसबुकमुळें मला कळलं
फेसबुक मधून लोकांचे स्वभाव कळतांत
वास्तवातली स्पर्धा, ईर्षा फेसबुक वरही आहे
जळणं आणि जाळणं इथे ही आहे
आता आरशात कोणी पाहत नाही
उठल्यापासून लोकं फेसबुकच पाहतात
आम्ही प्रेम, दुःख हे फेसबुक द्वारेच व्यक्त करतो
लोकांचा IQ, EQ फेसबुक मुळेच कळतो
व्यक्तिमत्वं मोजण्याचे
एकक आता फेसबुक आहे
आमच्या भावनाच काय आम्हाला फेसबुकने कधीच विकत घेतले आहे.
