तिचे जीवन
तिचे जीवन
झोपेतून उठताना
गजराची ठणठण
चाबूक मारावा असे
आहे तिचे हो जीवन
फास्ट लोकल पकडा
आँफिसची वेळ गाठा
बाँसची मर्जी सांभाळा
ज्यादा कामही स्विकारा
काळ काम वेग ह्यांचा
मेळ बसवावा लागे
मनी असंख्य ताणांचा
बोजा वाढतच राहे
जरी आँफिस सुटले
सुरु घरचे विचार
व्यथा अन् विवंचना
मना बोचती अपार
भार वाहते सा-यांचा
तरी हसतमुख असते
सुखी संसाराचे हेच
रहस्य सांगत असते
