चित्र मनोहर
चित्र मनोहर
झाडे पाने पक्षी सुंदर
जग भोवती दिसे सुंदर
वैविध्याने नटली पृथ्वी
मनुष्य पाही चित्र मनोहर
जतन करावी सृष्टी सुंदर
अनुभवावे सारे तरंग
पावसाळा हा देई जीवन
तृषार्त धरेचे भिजव अंग.
हवा थंड ही दे हिवाळा
दवबिंदूची शाल पांघरे
वाळू वारा पीक डोलते
अनुभवावे सुखद वारे.
ऊनासंगे वसंत येई
नटते सजते सृष्टी बाई
नाना रंगी होळी खेळे
मनामनाला बहरच येई.
