स्त्रीशक्ती
स्त्रीशक्ती
असे आदिम स्त्रीशक्ती
जगा इतकी जगात
नका समजू कस्पट
तिला कधीही स्वप्नात
झाले अनंत बदल
तरी तिची सत्ता मोठी
आदिमाया जगदंबा
तिला नंदी जगजेठी
दिली दाखवून तिने
उर्जा साऱ्या जमान्यात
उमा, जान्हवी, सावित्री
हिमा, सिंधु, इंदिरेत
भ्रूणहत्या बलात्कार
साक्ष देती दुष्टतेची
आहे गरज समाजा
त्रिशूलाच्या कालिकेची
घरोघरी जागवावी
समानता शिक्षणाची
संविधान अधिकार
गुरूकिल्ली स्त्री शक्तीची.
