तु माझे नसणे
तु माझे नसणे
आर्त पिळून जातसे
माझ्या मनाचे अंतर
सहजच समजती
भाव तुझे जरी दूर
नको आशा काही कधी
तुझ्या पुनश्च भेटीची
असे भयाण जाणीव
तुझे माझ्या नसण्याची
होता निर्णय मनाचा
जरा कर्तव्य कठोर
झाले जिद्दीने दूर
कापूनिया सारे दोर
आज दग्ध दुराव्याने
किंवा म्हणावे प्रेमाने
हाल मनाचे माझ्याच
मला कळती नव्याने
आज व्यापक बनले
प्रेम आतले आपले
ओढ भेटीची मनाच्या
मना उगा पुन्हा जाळे