माझी मराठी
माझी मराठी
1 min
188
मराठी
आमची मायबोली
बोल मायेने शिकलो
जी आमुची सहज बोली" १"
मराठी
नाना रुपे
लहेजा असे वेगळा
जिची गावोगावी भिन्नभिन्न रूपे"२"
मराठी
दिले साहित्य
जे गोड अमृताहून
आहे सरस अन्य भाषेहून"३"
मराठी
जिंकते मनास
कादंबरी कथा नाटके
भारुडे गाणी गोंधळ खास"४"
मराठी
म्हणताच अभिमान
नसे फक्त भाषा
असे आमच्या संस्कृतीचा स्वाभिमान "५"
