अविचल
अविचल
निष्पर्ण वृक्षाची जाळी
सुवर्ण सांडले सकाळी
ऊबदार कवडसे तेजाचे
उगवता रवी डोंगर उजळी
पक्षी गुंजारव भोवती
माणसे घेती निसर्ग अनुभूती
प्राण्यांचे घर डोंगरावरती
मोर चरावयास निघती
सह्याद्री कडेकपारीत
देवी वसे कड्यावर
अनवट डोंगरावरून
पहावा विस्तीर्ण सभोवार
बेरकी मतलबी माणसे
निसर्ग मायाळू अबोल
जावे कुशीत प्रेमाने
दूर माणसे गिरी अविचल