STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

3  

Archana Murugkar

Abstract

सोनसकाळ

सोनसकाळ

1 min
315

सोनकोवळ्या रविकिरणांनी अंधार दूर झाला. 

पहाटवारा धुक्यातूनी रुणुझुणतच आला. 


सोनपावली रविकिरणांची सांडते तेजमाया

झाडे-वेली, पक्षी-प्राणी तत्पर जागे व्हाया. 


मनुष्यप्राणी जागा होई प्रसन्न मंगल वेळी

दिशा-उपदिशा सुंदर दिसती मोहक प्रभात काळी. 


निलनभांगणी पक्ष्यांचीही चाले शर्यत गंमत

किलबिलाटातून गायन चाले माधूर्यमयी स्वरात. 


सृष्टी नटली, सजली-धजली लेवून नवे लेणे. 

रवि पाहून चमचमणारा प्रसन्न गाऊ गाणे. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract