STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

छोट्यांची सहल

छोट्यांची सहल

1 min
281

पॉम पॉम मोठा झाला

झुक झुक गाडी भोंगा

चढा चढा लवकर 

गाडी सुटेल सांगा


मामा मामीच्या गावाला

आम्ही सगळे चाललो

झुक झुक गाडीमधे

खिडकीशी बसलो


गोड गोळ्या बिस्किटे

इडली चटणी आणली

तरी विकत घेतली

कटलेट नि चटणी


गाडी घाडात वळता

गुडुप काळोखात गेली

अंधारात मनू मला

घट्ट घट्ट बिलगली


दरीमधे सुंदर दिसे

हिरवे हिरवे रान

खिडकीतून डोकावता

हरपून जाई भान


आले आले कणकवली

मामा मामी मुले आली

अशी आमची घाटातली

सहल मजेत झाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract