STORYMIRROR

S P J

Abstract Tragedy

3  

S P J

Abstract Tragedy

.. येशील तुआहे खात्री नक्की येशील तु..

.. येशील तुआहे खात्री नक्की येशील तु..

1 min
253

तुच होता श्वास, अनं ध्यास ही तुच जिवलगा.....

पण नाही ठेवनार तुझी आस जिवलगा,.....

पण तरीही माझा गुंतलेला श्वास तुच


काहीच न बोलता, न काही सांगता.....

न ऐकले काही, नाही काही भावना समजून घेता.....

एकाकी असा करुन गेला, त्या भरगच्च अशा जगात. ....


घाबरलेली, थबकलेली, गोंधळेल्या अवस्थेत

होते पाहत वाट मी एकटक, एकजीव

होउनी दिवस अनं रात.......


खूप काही केल्या चुकलेली वाट ..

काही केल्या मात्र मला सापडेना......

आता घाबरूनी वेगही घेतला पावलांने..

येता-जाता दिसेल त्यास रस्ता तुझा विचारत बसले......


खुप रडले, किंचाळले खुपदा ....

पुन्हा पुन्हा विचारले जाब स्वतःला

कोणता गुन्हा तु केलास अनं शिक्षा म्हणुण 

तो गेला सोडून.?? 


तुला शोधता कुठे आले समजेना काही

उमजेना काही तरी चालतानाही न थकलेले हे पाय

मनाच्या भरगच्च अशा विश्वासात .....

तुला भेटेन हे मन नक्की भेटशील या आतुरनेने आस लावून बसलेले आहे....


येशील तु, हात-हातात घेशील तु, 

तुझ्या त्या डोळ्यांत ही दिसेल मला 

माझे एकरुप झालेले तुझ्यातले माझेही चित्र

त्या क्षणी जरी असेल सुकलेले माझे डोळें तरीही

तुझ्या नजरेत असेल तेव्हा आकाश भरुनी इतके....


येशील तु, हो नक्की येशील तु.. 

श्वासाच्या असेल फक्त तुझीच वाट... 

फक्त श्वासाचा धागा तुटण्याआधी,

येणार ना तु, आहे मला खात्री येशीलच तु

हो नक्की येशील तु.........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract