फाटका मास्तर
फाटका मास्तर
कानाने खूप गोष्टी ऐकल्या,
वाईटाची चर्चा दिवा लावून केली.
डोळ्यांना दिपवले दाखवून नीतिमत्ता चांगल्या,
धिक्कारले हे मोठेपण,
फाटक्या शब्दांनी मनाला आग लावल्या
भाषणासाठी गर्दी कशाला करताय
त्यांचे विचार आणि शब्द गुदमरतायत.
तसे त्यांचे शब्द सत्य आहेत,पण ते फेकू दिसतायत
सार गुंडाळून आले आहेत ते डोईवर.
तुमच नेसान कडून घेतील गोड बोलीवर
चौकीतला गरीब आला होता घरी,
अर्धी भाकरी ताटात सोडून गेलो,
बरोबर त्याच्या माहेरी.
नेत्यांन विषय लोकांना भडकवता
तुम्ही सत्यवादी बनून ठेंबा मिरवता
बंद करा या चाड्या,
लाकड पोचली सरणावर आता गाड्या.
दोन वीर एक मेकास भिडले.
एक हक्कासाठी लढत होता.
दुसरा जबाबदारी निभवत होता.
एक रडत होता.
दुसरा मनात जळत होता.
एक माघार घेत नव्हता
दुरा पुढाकार सोडत नव्हता.
हात जोडून गर्दीत उभा त्यांना त्याग दिसत होता
रक्षक मनावर दगड ठेवून पाप करत होता
खुर्ची वर बसलेला मज्या बघत होता.
जिंकला कोण?
हरला कोण?
हा प्रश्न साऱ्याना पडला.
बदनामीचा डाग मास्तरच्या वाट्याला आला.
खऱ्या मास्तराचा फाटका मास्तर झाला
