STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

निसर्ग करामत

निसर्ग करामत

1 min
242

निसर्ग हा मोठा जादूगार, 

झाडं ठेवतो हिरवीगार  


ताडामाडाची उंच उंच झाडं 

नारळात कसे पाणी गोड 


पावसाची येता सर, थुईथुई लागतात मोर नाचू

गवतावरचे दवबिंदू भासू लागतात मोती, हिरवे पाचू 


कमळ रुजते सरोवराच्या काठी, दरवळतो कसा मंद

गंध बघून नयनरम्य कमळ मनही होते धुंद 


कळीचे होते फुल, फुलामध्ये दडतो मकरंद कुपीत 

मधमाशीला कसा लागतो सुगावा हे मोठे गुपित

 

हातात हात धरून चालायचे येता गुलाबी थंडीचा कहर

धुक्याच्या वाटेवर प्रेमाला येतो बहर


या बहराला फुटावा जसा आंब्याचा मोहर, बकूळीच्या फुलाचा सुगंध लुटावा आनंद

निसर्गाचा, क्षणात गवसतो तो लाखमोलाचा छंद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract