उनाड, उनाड वारा
उनाड, उनाड वारा
वाऱ्याने तुटतो हलका तारा
लिहिताना दछेडतो मी अजिंक्यतारा.
डोंगराच्या माथ्यावर तुफानी भरा.
चित्याची झेप आमचा अभिमानी तोरा
उनाड, उनाड हा सातारी भिडा.
कडव्या बोलीत, कंदी पेढा.
सातारी बोल आमचे झोंबतील जरा
उनाड, उनाड उनाड बाणा
वाऱ्यावर उडतो हलका तारा
लिहिताना दछेडतो मी अजिंक्यतारा.
चेऱ्यावर हासू, डोक्यावर टोपी,
मिशिवर ताव आमचा रुबाबी ख्याती
राजकारण आमचं दिल्लीच्या वरती.
गाजे मैदाने आम्ही कुस्तीचे महार्थी.
केसरी, केसरी चितपट करती.
भलेभले आमच्या पुढे मस्तक टेकती
लोकप्रिय आम्हाला महाराष्ट्राची माती.
जीवापाड जपतो आम्ही महाराजाणची कीर्ती..
लाखात झळके ही ,शिव राजधानी,
कणखर कणखर माझी सातारी संस्कृती.
थकलेल्या काठीला गावचा कणा
सोडून आलो मुंबईला गाव सारा सुना
डोळे भरले बालपण आठवून पुन्हा, पुन्हा
एका गावात तर चार, चार पार्ट्या.
गाव झाला उधवस्त सुधार जरा कार्ट्या
मेल्यावर जळणार हिथेच भामट्या.
उनाड, उनाड, उनाड नाळ वेशीवर पुरल्या.
नाद नाय हलक्या या गोष्टीचा भरा
वावरात उभा केलाय किल्लारी जोडा.
वाघिणीला शोभतोय शेतकरी खरा
सीमेवर लढतोय धाकाडी जिगरा
वर्दीत शोभतोय पोलादी जंजिरा
उनाड उनाड सलाम सातारी वीरा.
