प्रेम
प्रेम
तुझ्याशी प्रेम
स्पंदन मनाचे
भाव अंतरीचे
ओढ अनाम.
संदेश देते
मनाच्या शाईने
लगेच घाईने
उरी भेटते.
दाखवी रस
प्रत्येक बाबीत
दोघांच्या लयीत
पेहरावात.
नको अबोला
विरहाचे भय
धरूनी संशय
खंड प्रितीला.
सांज सावळी
आठव मनात
मनाच्या डोहात
कातरवेळी.
