निस्पृह
निस्पृह
प्रयत्न करणंच
आपल्या हातात असतं
फळ देणं हे मात्र
त्याच्या हातात असतं
माणसाने फळाची अपेक्षा
न ठेवता प्रयत्न करावे
शक्य होईल तितके
फळाचा विचारदेखील करू नये
निसर्ग जसा आपल्याला
कोणतीही आशा न ठेवता पोसतो
अगदी त्याच पद्धतीने
प्रयत्न करावेत फक्त प्रयत्न
फळाची अपेक्षा ठेवून
केलेलं काम म्हणजे स्वार्थ
अश्या कामास कधीच नसतो
कोणताही अर्थ
