STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Others

4  

🤩ऋचा lyrics

Others

तो अलवार भिजवुनी गेला

तो अलवार भिजवुनी गेला

1 min
320

हृदयाच्या जखमांवरती

तो अलवार फुंकूनी गेला

पाऊस माझ्या शुष्क भावनांना

अलवार पणे सुखावून गेला


निष्पर्ण झाडापरी हृदय माझं

त्यावरी त्याचा एक थेंब ओघळला

स्पर्शून गेला प्रत्येक थेंब अंगास

अन हृदयात माझ्या तो भिनुन गेला


अंगावरती झेलूनी धारा

फुटले निष्पर्ण हृदयास बांध

सोबतीस माझ्या होती हिरवळ

अन ओल्या मातीचा सुगंध


कोसळत होत्या डोईवर सरी

आला भावनांना पूर

सौंदर्य वाढवी या क्षणांचे 

कोकिळे चे मंजुळ सूर


वाळवंटा परी हृदय माझं

तो आला अन मज स्पर्शूनी गेला

पावसाचा प्रत्येक थेंबाने जसा

मनी प्रेमाचा अंकुर फुलला


इंद्रधनुनी बांधली मखर

आरास सजली मावळती किरणे

कुंद कळ्या नी मोहरले मी

आज फिटले डोळ्याचे पारणे


हसल्या वेली, हसली पाने

हसली सारी सृष्टी

लाजून थबकले हृदय माझे

जे होते दुःखी कष्टी


आजचा पाऊस मजला

काहीतरी वेगळाच वाटला

कौलावरून बरसला तो

अन माझ्या हृदयात विसावला


व्याकुळ हृदयास माझ्या

तो अलवार स्पर्शूनी गेला

सुकून गेलेल्या भावनांना

तो अलवार भिजवुनी गेला


पुनःच उमटला इंद्रधनू

फुलली बाग माझ्या स्वप्नांची

आता पुनः पुनः वाट पाहते

काळ्या मेघातून तो बरसण्याची


Rate this content
Log in