STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

माफ कर चिऊताई

माफ कर चिऊताई

1 min
258

मी बाल्कनीत बसले होते

आस्वाद घेत लस्सीचा

चिऊ ताई आली अन म्हणाली मला

ताई,मिळेल का एक घोट पाण्याचा


पाणी पिऊन झाल्यावर 

हळूच ती रडायला लागली

इवलीशी चिऊताई का आज

मुसुमूस रडायला लागली?


चिऊताई मला म्हणाली -

 

उन्हाने या व्याकुळतेय मी

रस्त्यावर कुठंच पाण्याचं डबकं नाही

सपाट गुळगुळीत रस्त्यांवर

आमचं तळं आता राहीलच नाही


कासावीस झाला जीव माझा

घसाही आता सुकून गेला

गेले तीन दिवस पाणी न मिळाल्याने

आमच्या झाडावरचा एक पोपटही मेला


नदी नाले विहिरी आता

कुठेच पाहायला मिळत नाहीत

चिऊ चिऊ करून व्याकळतो जीव

पण त्याची कुणालाच येथे पर्वा नाही


चिऊताई पुढे जे बोलली

ते खूप भयंकर होतं

का कोणास ठाऊक 

ते माझ्या मनालाही पटलं होतं


चिऊताई म्हणाली पुढे-


मोठमोठ्या बंगल्यात तुमच्या

पक्ष्यांसाठी मात्र जागा नाही

गंगा दारी असूनही 

माणुसकीची गंगा कोरडीच राही


मी म्हणाले तिला

चुकलं ग चिऊताई

मी तुझी माफी मागते

इथून पुढून न चुकता

तुझ्यासाठी पाणी भरून ठेवते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational