वाह रे माणसा!
वाह रे माणसा!
वाह रे माणसा, वाह रे माणसा
किती तू पैसा पैसा करतोयस
शेवटी तुला सगळंच इथंच टाकायचंय
हे मात्र तू का विसरतोयस?
वाह रे माणसा, वाह रे माणसा
किती तू पैश्याचा हव्यास धरतोयस
पैसे मिळवण्याच्या नादात,
किती समाधानाने आयुष्य जगतोयस?
वाह रे माणसा, वाह रे माणसा
पैश्याच्या मोहात तू तुझं आयुष्य विसरतोयस
कधी मोहाला बळी पडून तू
तुझं आयुष्यच पणाला लावतोयस