STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Children Stories

3  

🤩ऋचा lyrics

Abstract Children Stories

आई

आई

1 min
275

काय असते आई?

खरंच शब्दात ती मांडता येईल का?

अहो आजपर्यंत कोणी

आकाशाला कवेत घेतलंय का?


आई म्हणजे काय असते 

तिचं प्रेम अतुलनीय असतं

फक्त आपण साऱ्यांनीच 

तिचं प्रेम अनुभवायचं


आई हीच परमेश्वर

तीच वासराची गाय

स्वर्गाची अनुभूती म्हणजे आई

जशी दुधावरचीच साय


आईच असते पहिला गुरू

जी आपल्याला घडवते

बाळाचं सगळं सुख

ती त्याच्या जन्माअगोदरच पाहते


आई इतकं प्रेम करण्यासाठी

आईच व्हावं लागतं

आई इतकं निःस्वार्थ होणं

खूप कठीण असतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract