Prompt 4 ... वेळ
Prompt 4 ... वेळ
1 min
214
वेळ आहे एकमार्गी
ती कुणासाठी थांबत नाही
कोणी होते वेळेवर स्वार
कोणी वेळेतच वाहवत जाई
वेळेचे महत्व जाणू
वेळेचे नेहमीच नियोजन करू
प्रत्येक मिनिट विकासासाठी
सतकर्मी लावण्याचा हट्ट धरू
पैश्यापेक्षा मौल्यवान असते
वेळ कुणालाही थांबत नसते
प्रत्येकासाठी 24 तासांची आखणी
तिने समानच केलेली असते
